Indigo-Airbus Deal: भारताच्या विमान खरेदी व्यवहारानं रचला इतिहास! IndiGoनं खरेदी केली 500 विमानं

Indigo-Airbus Deal: भारताच्या विमान खरेदी व्यवहारानं रचला इतिहास! IndiGoनं खरेदी केली 500 विमानं

Indigo News Update : इंडिगो ह्या खाजगी एअरलाईन्सने ५०० नवीन एअरबस ए३२० फॅमिली एअरक्राफ्ट खरेदीची ऑर्डर दिली आहे. आजपर्यंत भारतीय एअरलाईन्सने दिलेली ही सर्वात मोठी आर्डर आहे. या विमानांची डिलिव्हरी २०३० ते २०३५ या दम्यान मिळणार आहे.

इंडिगोने ५०० नवीन एअरबस A320 विमानांची ऑर्डर दिली आहे. एवढी मोठी ऑर्डर दिलेली इंडिगो जगातली पहिली कंपनी ठरत आहे. 50 अब्ज डॉलर किंमतीचा हा करार आहे. भारतातून या वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर देण्याची दुसरी वेळ आहे. याच वर्षात टाटाची मालकी असलेली एअर इंडिया कंपनीने एअरबस आणि बोईंगसह ४७० नवीन विमान खरेदी घोषणा केली होती.

५०० नवीन A320 विमानांच्या खरेदीच्या करारावर इंडिगोचे प्रमोटर आणि एमडी राहुल भाटिया, इंडिगोचे सीईओ पीटर्स एलबर्स यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. कंपनीने ट्वीट करुन सांगितलं की, या करारांतर्गत भारतात अफोर्डेबल ट्रॅव्हलला प्रोत्साहन देण्यासाठी मदत होईल.

इंडिगोचे सीईओ पीटर्स एलबर्स यांनी यावेळी सांगितलं की, इंडिगोची ५०० एअरबस ए३२० विमानांची खरेदी ऐतिहासिक आहे. या करारांतर्गत इंडिगो एक हजार विमानांची ऑर्डर दशकभरामध्ये देत आहे. भारताच्या आर्थिक विकासाला आणि इंडिगोला ध्येयपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

टाटाच्या एअर इंडियाने यावर्षी ४८७ विमानांची ऑर्डर दिली होती, पण इंडिगोची ऑर्डर त्यापेक्षा मोठी असल्याचे ही ऐतिहासिक घटना झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com