International Airport : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन फटाफट! ‘एफटीआय-टीटीपी’ सेवा कार्यान्वित

भारतीय पारपत्रधारकांना आता येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेमुळे किंवा इमिग्रेशन प्रक्रियेमुळे फार काळ ताटकळत बसावे लागणार नाही.
amit shah
amit shahsakal
Updated on

नवी दिल्ली - भारतीय पारपत्रधारकांना आता येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेमुळे किंवा इमिग्रेशन प्रक्रियेमुळे फार काळ ताटकळत बसावे लागणार नाही. प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी केंद्र सरकारने फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रॅम (एफटीआय-टीटीपी) म्हणजे ‘वेगवान विश्‍वासार्ह स्थलांतर प्रवासी योजना’ सुरू केली असून अशा प्रकारची सेवा देणारे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ ठरले. इमिग्रेशन ब्युरो आणि गृहमंत्रालय यांच्या संयुक्त पुढाकारातून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

इंदिरा गांधी विमानतळावर टर्मिनल ३ येथे स्थापन केलेल्या विभागाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आज अनावरण केले. या सुविधेचा लाभ भारतीय पारपत्रधारक आणि ओसीआय (ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया) कार्डधारकांना होणार आहे. या सुविधेमुळे संबंधित प्रवाशांचा आंतराष्ट्रीय प्रवास वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.

सरकारची ही योजना बहुद्देशीय प्रकल्पांपैकी एक आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारची भारतीय प्रवासी आणि ओसीआय कार्डधारकांप्रती असणारी बांधिलकी स्पष्ट झाली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सशुल्क अर्ज भरावा लागणार आहे. अर्जात तफावत आढळून आल्यास किंवा महत्त्वाचा मुद्दा लपविल्यास अर्ज नामंजूर केला जाईल.

एखाद्या अर्जदाराचे तांत्रिक कारणांमुळे बायोमेट्रिक घेता येत नसेल तर त्याची ‘एफटीआय-टीटीपी’साठी नोंद केली जाणार नाही. पात्र व्यक्तीला ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या अर्जात आवश्‍यक माहितीसह आपल्या बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट आणि चेहऱ्याची प्रतिमा) द्यावी लागेल. मोबाईल ओटीपी आणि ईमेलद्वारे पडताळणी केल्यानंतर आणि ओळख पटल्यानंतरच अर्जदाराची नोंदणी होईल.

विमानतळावरची गर्दी कमी करण्यासाठी आणि स्थलांतराची प्रक्रिया लवकर होण्यासाठीच फास्ट ट्रॅक इमिग्रेशनची सुविधा कार्यान्वित केली. या सुविधेचा लाभ घेणाऱ्यांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा असेल. दिल्ली विमानतळावर टर्मिनल तीनमध्ये आठ इलेक्ट्रॉनिक दरवाजे आहेत. चार प्रवेशासाठी आणि चार प्रस्थान करण्यासाठी. या आधारावर या सुविधांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना तातडीने विमानापर्यंत पोचणे शक्य हेाणार आहे.

सुविधेचे स्वरुप

  • www.ftittp.mha.gov.in वर विवरण नमूद करा.

  • इमिग्रेशन ब्युरोकडून विवरणाची पडताळणी केली जाईल. खातरजमा केल्यानंतर बायोमेट्रिक विवरण आणि फेशियल रिक्गनायजेशन नोंदविण्यासाठी मेल किंवा मेसेज पाठविला जाईल.

  • अर्ज करताना पारपत्रकाची मुदत किमान सहा महिन्यांपर्यंत असावी

  • प्रक्रिया शुल्क : वयस्क प्रवाशासाठी २ हजार रुपये, अल्पवयीनसाठी एक हजार रुपये व ‘ओसीआय’ साठी १०० डॉलर

  • पाच वर्षांसाठी या सुविधेचा लाभ घेता येईल. पारपत्राचा कालावधी अगोदर संपत असेल तर त्या कालावधीपर्यंत सुविधा मिळणार.

तंत्रज्ञानाने कार्यान्वित होणारी इमिग्रेशन प्रक्रिया वेगवान आणि सुलभ करण्यासाठीच ही योजना आणली. पात्र पारपत्रधारक आणि ओसीआय कार्डधारकांना या माध्यमातून ई-गेटचा वापर करता येईल.

- विदेह कुमार, सीइओ, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com