

Chief Minister Dr. Mohan Yadav interacting with patients during his visit to hospitals in Indore following the contaminated water health emergency
Indore Water Pollution : मध्य प्रदेशातील इंदौर शहरात दूषित पाण्यामुळे उद्भवलेली आरोग्य आणीबाणी पाहता मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा ताबा घेतला आहे. मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी इंदौरमधील वर्मा रुग्णालय, विमा रुग्णालय, एम.वाय. रुग्णालय यांसह विविध खासगी रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णांची विचारपूस केली. "घाबरू नका, तुम्ही लवकरच बरे होऊन घरी परताल, तुमच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करेल," अशा शब्दांत त्यांनी बाधितांना धीर दिला. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे पुरवण्याचे कडक निर्देश दिले आहेत.