दोन कुत्रे भांडू लागले, नंतर मालकांमध्ये रक्तरंजित संघर्ष! गार्डचा छतावरून गोळीबार, २ जणांचा मृत्यू

mp crime news
mp crime news

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दोन गटात मोठा वाद झाला आहे.  बँकेच्या सुरक्षा रक्षकाने बंदुकीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.

या दुहेरी हत्याकांडानंतर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णा बाग कॉलनीत रात्री उशिरा बँकेच्या गार्डने दहशत निर्माण केली. कुत्र्याला फिरवण्याच्या क्षुल्लक कारणावरून गार्डचा शेजाऱ्यांशी वाद झाला.

यानंतर गार्डने परवाना असलेल्या बंदुकीने गोळीबार केला. यामध्ये शेजारी राहणाऱ्या जावई आणि मेव्हण्याचा मृत्यू झाला. त्यात सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी आरोपी राजपाल सिंग याला अटक करून परवाना असलेली बंदूक जप्त केली. (crime news)

गार्ड राजपाल रात्री कुत्र्याला फिरवत होता. इतक्यात दुसरा कुत्रा आला. दोन्ही कुत्रे भांडू लागले तेव्हा राहुलच्या कुटुंबीयांनी बाहेर येऊन विरोध केला. यानंतर सुरक्षारक्षकाशी वाद सुरू झाला. वाद वाढल्यावर राहुलच्या घरातील बाकीचेही बाहेर आले.

mp crime news
Pakistan Cabinet : दहशतवादी यासिन मलिकची पत्नी झाली पाकिस्तानच्या पंतप्रधानांची विशेष सल्लागार; नव्या कॅबिनेटने घेतली शपथ

यानंतर सुरक्षारक्षक घराकडे धावला आणि बंदूक घेऊन पहिल्या मजल्यावर पोहोचला. गार्डने टेरेसवरून राहुल, विमल आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गोळीबार केला. त्यात दोघेही ठार झाले. विमलचे निपानिया येथे सलून आहे. त्याचा विवाह राहुलची बहीण आरती हिच्याशी 8 वर्षांपूर्वी झाला होता. त्याला दोन मुली आहेत. (latest marathi news)

आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी परवाना असलेली बंदूक जप्त केली आहे.

mp crime news
Talathi Bharti: तलाठी भरती गैरप्रकाराबाबत फडणवीसांना आधीच सांगितलं होत, तरी आरोपी मोकाट कसा?; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com