

Indore EV Fire Tragedy: 8 Family Members Killed After Charging Short Circuit
esakal
Indore Electric Vehicle Fire : इंदूर शहरात एका घराबाहेर इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावल्यानंतर रात्री उशिरा शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून उसळलेल्या आगीने संपूर्ण कुटुंबाला वेढले. या दुर्घटनेत घरमालकासह आठ जण जळून मृत्यूमुखी पडले. घटना काल रात्री घडली असून, पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास चार्जिंग पॉइंटवर अचानक विद्युत् प्रवाहाची अनियमितता निर्माण झाली. त्यामुळे कारमध्ये आग पेटली आणि ती वेगाने घराच्या आत शिरली. आत असलेल्या गॅस सिलिंडरला धडकून आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण इमारत धुराने भरून गेली.