Indore Temple Accident: इंदूरमधील मंदिर दुर्घटनेत 35 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Indore Temple Accident
Indore Temple Accidentesakal

मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरूवारी इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एका विहीरी वरील छत कोसळल्याची घटना घडली होती. यामध्ये तब्बल 35 जणांचा मृत्यू झालाच्या माहिती जिल्हाधिकारी इलैया राजा टी यांनी दिली आहे. तर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. अजून ही शोध कार्य चालू आहे.

लष्कराचे सुमारे 75 लोक आले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम तैनात आहे. ही विहीर खूप जुनी आणि खोल असल्याने बचाव कार्याला वेळ लागत आहे. इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर येथील शिवमंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याने अनेक लोक विहिरीत पडले होते. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

इंदूरचे जिल्हाधिकारी इलैया राजा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 4-4 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

इंदूरचे जिल्हाधिकारी इलैया राजा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चर्चा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 4-4 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सपना संगीता रोडवरील स्नेह नगर येथे हवन सुरू असताना हा अपघात झाला. कन्यापूजनाचा कार्यक्रम असल्याने मंदिरात खूप गर्दी होती. विहिरीच्या छतावर अनेक लोक बसले होते. जास्त वजन झाल्यामुळे छत कोसळले. हे मंदिर सुमारे 60 वर्षे जुने आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इंदूरचे जिल्हाधिकारी आणि इंदूरच्या आयुक्तांशी फोनवर चर्चा करून बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालय इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. इंदूर पोलिसांचे उच्च अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे उच्च अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com