
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तणावाच्या कड्यावर आहेत. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला, ज्यात दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती आणि माजी परराष्ट्र सचिव कंवल सिबल यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत सिंधु जल करार (Indus Waters Treaty - IWT) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.