esakal | 'चला, कोरोना पसरवूया' अशी पोस्ट करणाऱ्याला अटक; इन्फोसिसकडून हकालपट्टी

बोलून बातमी शोधा

Infosys

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला असताना, या कर्मचाऱ्याने असे आक्षेपार्ह ट्विट केले आहे. सरकारकडून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे.

'चला, कोरोना पसरवूया' अशी पोस्ट करणाऱ्याला अटक; इन्फोसिसकडून हकालपट्टी
sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर : बंगळूरमध्ये इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने 'चला, घराबाहेर पडू आणि कोरोना पसरवूया' अशी पोस्ट केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची इन्फोसिस कंपनीनेही हकालपट्टी केली आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला असताना, या कर्मचाऱ्याने असे आक्षेपार्ह ट्विट केले आहे. सरकारकडून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. मात्र असे असले तरी, अजूनही लोकं घराबाहेर पडत आहेत. यातच बंगळुरूमधील एका अभियंत्याने लोकांना बाहेर पडा आणि शिंका असे पोस्ट केले होते. या अभियंत्यावर कोरोनव्हायरस पसरवण्यासाठी लोकांना भडकवल्याचा आरोप पोलिसांनी अटक केली आहे. 

इन्फोसिस या कंपनीत काम करणाऱ्या 25 वर्षीय मुजीब मोहम्मद या अभियंत्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, की चला हात मिळवा, घराबाहेर या आणि सार्वजनिक ठिकाणी शिंका आणि कोरोना पसरवा. बेंगळुरूचे पोलिस सहआयुक्त संदीप पाटील यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “ज्या व्यक्तीने लोकांना उघड्यावर शिंकायला आणि विषाणूचा प्रसार करण्यास सांगितले, त्याला अटक करण्यात आली आहे. तो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो''. इन्फोसिसनेही या अभियंत्यावर कंपनीनेही कारवाई केली आहे.