Rishi Sunak : 'जावई होणार यूकेचे पंतप्रधान'; इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी दिली खास प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Infosys founder Narayana Murthy

दिवाळीच्या दिवशी ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

Rishi Sunak : 'जावई होणार यूकेचे पंतप्रधान'; इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी दिली खास प्रतिक्रिया

Britain PM Rishi Sunak : सध्या भारतात दिवाळीचा (Diwali) सण साजरा केला जात आहे. दिवाळीचा सण भारतीयांसाठी खास आहे. कारण, यावेळी दिवाळीच्या दिवशी ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी (Prime Minister of Britain) निवड झालीय.

ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सासरे नारायण मूर्ती यांनी विशेष प्रतिक्रिया दिलीय. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy, founder of Infosys) यांच्या मुलीचं लग्न ऋषी सुनक यांच्याशी झालं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ऋषींचं अभिनंदन केलं. आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि त्यांच्या यशासाठी शुभेच्छा. युनायटेड किंगडममधील लोकांसाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील, असा आम्हाला विश्वास आहे. असं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: VIDEO : प्रवचन देताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका; लोक म्हणाले, असा मृत्यू करोडोंमध्ये एकालाच मिळतो!

कोण आहेत ऋषी सुनक?

ऋषी सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी इंग्लंडमधील साउथम्प्टन इथं झाला. ऋषी यांच्या आईचं नाव उषा आणि वडिलांचं नाव यशवीर सुनक आहे. यशवीर सुनक हे व्यवसायानं डॉक्टर असून आई उषा सुनक या फार्मासिस्ट आहेत. ऋषी सुनक यांना दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचं नाव अक्षता मूर्ती आहे. अक्षता या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. अनुष्का आणि कृष्णा अशी ऋषी सुनक याच्या दोन्ही मुलींची नावं आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! बसवलिंग स्वामींचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला; दोन पानी सुसाईड नोटही सापडली

ऋषी सुनक 'बंगळुरूचे जावई'

ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल बंगळुरूमध्ये (Bangalore) विशेष जल्लोष करण्यात आला. कर्नाटकचे खासदार राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार्‍या सुनक यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले, ."संपूर्ण युरोप कठीण काळातून जात असताना सुनक हे पंतप्रधान होत आहेत. मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटलो आहे. ते एक सक्षम व्यक्तीमत्व आहे." वोल्वो ग्रुप इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष कमल बाली म्हणाले, "भारतीय वंशाचा कोणीतरी ब्रिटनचा पंतप्रधान होत आहे, हे आनंददायक आहे. ऋषी सुनक यांच्या उदयानं हे सिद्ध केलं की, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकासाठी संधी आहे. हे एक चांगलं लक्षण आहे."