काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; चिमुरडीसह चौघे जखमी

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

सोपोरच्या डांगेरपोरा गावातील एका घरावर काल (ता.6) रात्री उशिरा दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात गोळीबारात मुलगी आस्मा जानसह चार जण जखमी झाले.

श्रीनगर : काश्‍मीरमधून कलम 370 वगळल्यानंतर महिनाभरापासून राज्यातील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरू असताना दहशतवादीदेखील वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. यादरम्यान, उत्तर काश्‍मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी (ता.6) रात्री दहशतवाद्यांनी एका घरावर हल्ला केला. यात एका मुलीसह कुटुंबातील चार जण जखमी झाले. 

सोपोरच्या डांगेरपोरा गावातील एका घरावर काल (ता.6) रात्री उशिरा दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात गोळीबारात मुलगी आस्मा जानसह चार जण जखमी झाले. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले. या हल्ल्यातील जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलिस पोचले असून, दहशतवाद्यांचा तपास सुरू असल्याचे सांगितले. मोहंमद अश्रफ दार, मोहंमद रमजान दार आणि अर्शिद हुसेन अशी जखमींची नावे आहेत. 

विजेच्या धक्‍क्‍याने सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू 
जम्मू काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यात एका सीआरपीएफ जवानाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. हेड कॉंन्स्टेबल चालक के.एम.पी. नायर (रा. केरळ) हा राजौरी पोलिस लाइन्सवर कार्यरत होता. त्याचा काल नजरचुकीने क्वार्टर्स परिसरातील विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता त्याचे निधन झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injured four persons including a baby girl in terrorist attack at Sopore in Jammu Kashmir