
विशाखापट्टणम : अत्यंत महत्त्वाच्या अशा स्वदेशी बनावटीच्या ‘आयएनएस अर्नाळा’ या उथळ पाण्यात वावरू शकणाऱ्या युद्धनौकेचा अधिकृत समावेश भारतीय नौदलात करण्यात आला. ही नौका भारताच्या ‘ब्ल्यू वॉटर’ आकांक्षांमध्ये महत्त्वपूर्ण टप्पा ठरते. ही पाणबुडीविरोधी युद्धासाठी कमी खोलीतील पाण्यात वापरल्या जाणाऱ्या युद्धनौका मालिकेतील (अँटी सबमरिन वॉरफेअर - शॅलो वॉटर क्राफ्ट) पहिली युद्धनौका आहे.