INS विक्रांत ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यान्वित होणार: अॅडमिरल करमबीर सिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Admiral Karambir Singh

INS विक्रांत ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यान्वित होणार: अॅडमिरल करमबीर सिंग

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

मुंबई : स्वदेशी विमानवाहू वाहक (IAC) INS विक्रांत ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी गुरुवारी दिली. मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.

सिंग म्हणाले की, "नुकतीच आम्ही INS विक्रांतची यशस्वी सागरी चाचणी घेतली असून ऑगस्ट 2022 पर्यंत INS विक्रांत कार्यान्वित करू शकू," INS वेला ही पाणबुडी देशाच्या सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी नौदलाची क्षमता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'विक्रांत'चे विराट रुप

INS वेला आजची गतिमान आणि गुंतागुंतीची सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, भारताच्या सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी तसेच, नौदलाची क्षमता वाढविण्यात याची असलेली क्षमता महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास अॅडमिरल सिंग यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय नौदल चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संरक्षण सहकाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोविड-19 आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाबद्दल (LAC) बोलताना नौदल प्रमुख म्हणाले की, नौदल प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकाळातील हे सर्वात कठीण आव्हान होते. नौदल प्रमुख म्हणून कोविड काळ माझ्या कार्यकाळातील सर्वात कठीण आव्हान होते. याच काळात LAC वरदेखील तणाव होता, त्यामुळे आव्हान अधिक कठीण होते. जहाजावर शारीरिक अंतर राखणे शक्य नव्हते, परंतु आम्ही या सर्व गोष्टींचा सामना केला.

loading image
go to top