esakal | इन्स्टाग्राम, फेसबुकने उडवून टाकली राहुल गांधींची 'ती' पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

इन्स्टाग्राम, फेसबुकने उडवून टाकली राहुल गांधींची 'ती' पोस्ट

sakal_logo
By
विराज भागवत

ट्विटरने काही दिवसांपूर्वी राहुल यांचे अकाऊंट केलं होतं लॉक

नवी दिल्ली: एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत घडली. या पिडितेच्या कुटुंबाची ओळख होऊ शकेल अशा प्रकारचा एक फोटो काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोस्ट केला होता. हा फोटो आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून काढून टाका अशी विनंती राहुल यांना व्यवस्थापनाकडून करण्यात आली होती. मात्र, राहुल यांच्याकडून तशी कृती न घडल्याने इन्स्टाग्राम, फेसबुकने राहुल गांधींची ती पोस्ट दोन्ही सोशल मिडियावरून उडवून टाकल्याची माहिती एएनआयने दिली.

हेही वाचा: नवरा अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करतो, MNC मध्ये काम करणाऱ्या महिलेचा आरोप

राहुल गांधी यांना फेसबुक व्यवस्थापनाकडून एक नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटिशीत एक विनंती करण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या पोस्टसंदर्भात १० ऑगस्टला राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडून फेसबुक व्यवस्थापनाला एक नोटीस आली होती. त्यानुसार, राहुल गांधी यांना त्यांनी केलेली पोस्ट काढून टाकावी अशी विनंती करण्यात आली होती. बालहक्क आयोगाने पाठवलेल्या नोटिशीत नमूद केल्याप्रमाणे तुम्ही जी पोस्ट केली आहेत त्यामुळे विविध कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट त्वरित हटवावी, अशी विनंती करणारी नोटीस राहुल गांधींना पाठवण्यात आली होती. पण राहुल गांधी यांनी त्याबद्दल कृती न केल्याने अखेर फेसबुकनेच ती पोस्ट दोन्हीकडून उडवून टाकली.

हेही वाचा: 'मी विराटच्या जागी असतो तर...'; वाचा सचिन तेंडुलकर काय म्हणाला

राष्ट्रीय बालहक्क आयोगाने अशीच एक नोटीस ट्वीटरला पाठवली होती. त्यामुळे राहुल गांधी यांनी ट्वीटर अकाऊंट ७ ऑगस्टला लॉक करण्यात आले होते. पण पिडीत मुलीच्या आईनेच राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो वापरण्याची परवानगी दिली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांच्या मार्फत झळकल्या. त्यानंतर काही वेळाने ट्वीटरने गांधी यांचे अकाऊंट पुन्हा अनलॉक केले. मात्र, मंगळवारी पुन्हा एकदा पिडीतेच्या आईने सांगितले की त्यांच्या कुटुंबाचा फोटो वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर भाजपच्या काही नेतेमंडळींनी पुन्हा राहुल यांचे ट्वीटर अकाऊंट लॉक करावे, अशी मागणी केली आहे.

loading image
go to top