जेव्हा आमदार मंत्रिपदाऐवजी घेतात मुख्यमंत्रिपदाची शपथ...

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

- एका आमदाराला मंत्रिपदाची देण्यात आली शपथ. 

- चक्क मुख्यमंत्रिपदाचीच घेतली शपथ.

- हा प्रकार झाला मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत. 

बंगळुरु : एकदातरी आयुष्यात मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा राजकीय नेत्याची असते. ती इच्छा अनेकांच्या बाबतीत खरंही होती. मात्र, कर्नाटकात एका आमदाराला मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यावेळी त्याने चक्क मुख्यमंत्रिपदाचीच शपथ घेतली. हा प्रकार झाला मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (मंगळवार) झाला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात 17 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र, कर्नाटकातील आमदार मधु स्वामी यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी बोलवण्यात आले. त्यावेळी शपथ घेताना त्यांनी मंत्रिपदाऐवजी मुख्यमंत्रिपदाचीच शपथ घेतली. 

दरम्यान, शपथविधीमध्ये अचानक घडलेल्या या प्रकाराने मधु स्वामी यांची काही काळ चांगलीच गडबड झाली. मात्र, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी त्यांच्याकडे पाहत स्मित हास्य केले आणि त्यांना मिठीही मारली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instead of taking oath as minister MLA takes oath as CM in Karnataka