

National Transport Master Plan' to be Prepared; Technical Appraisal of Projects Costing Over 500 Crores
Sakal
नवी दिल्ली : देशातील रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील विखंडित नियोजन संपुष्टात आणून सर्वसमावेशक मल्टिमोडल वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी केंद्र सरकारने ‘एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण’ (ITLA) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विशेष प्राधिकरणाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. विविध मंत्रालयांमध्ये समन्वय साधून वाहतुकीचा वेग वाढवणे, पायाभूत सुविधांची कार्यक्षमता सुधारणे आणि देशाचा लॉजिस्टिक्स खर्च लक्षणीयरीत्या कमी करणे हे या प्राधिकरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.