esakal | Delhi : कोणत्याही किमतीत अखंडता राखणे अत्यावश्‍यक
sakal

बोलून बातमी शोधा

new delhi

कोणत्याही किमतीत अखंडता राखणे अत्यावश्‍यक

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आमच्या राष्ट्राची एकता व अखंडतेची सुरक्षा कोणत्याही किमतीत सुनिश्चित करणे व राखणे अत्यावश्यक आहे, असे नवे हवाई दलप्रमुख एअर मार्शल विवेक राम ऊर्फ व्ही. आर. चौधरी यांनी आज सांगितले. हवाईदलाचे २७ वे प्रमुख (चीफ ऑफ एयर स्टाफ) म्हणून चौधरी यांनी कार्यभार स्वीकारला. लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्यापाठोपाठ आणखी एका मराठी अधिकाऱ्याकडे लष्कराच्या एका विभागाची सर्वोच्च सूत्रे आली आहेत.

मिग-२९ लढाऊ विमानाचे सारथ्य करण्यात कौशल्य असलेले व चीन सीमेसह विविध आव्हानात्मक आघाड्यांवर हवाई दलाचा झेंडा फडकत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे एअर चीफ मार्शल चौधरी यांनी मावळते प्रमुख आर के एस भदौरिया यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. हवाई दलात ३९ वर्षांचा दीर्घ अनुभव असलेले एअर मार्शल चौधरी यांनी हवाई दल अकादमीचे प्रमुख म्हणूही कार्य केले आहे. चीनने लडाखमध्ये भारताची कुरापत काढली तेव्हा ते हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाने पूर्व लडाखमध्ये आक्रमक मोहीम राबविली होती. सूत्रे स्वीकारल्यावर दिलेल्या संदेशात चौधरी यांनी सांगितले, की हवाई सेवेच्या पूर्ण इको प्रणालीवर नागरी विमान सेवेचा प्रभाव आहे. त्यामुळे सशस्त्र दलांसाठी जनरेशन नेक्स्ट लढाऊ हवाई तंत्रज्ञानाचा अभाव कमी करावा लागेल.

नवीन आव्हानांचा काळ

एअर मार्शल चौधरी हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ‘इस्त्रो’ची सध्याची उपग्रह प्रणाली हवाई दलाच्या सर्व गरजा- आवश्यकता पूर्ण करू शकत नाही, असे त्यांनी नुकतेच सांगितले होते. देशाच्या सशस्त्र दलांनी हाय-ब्रीड (सायबर व हवाई) आव्हानांसाठी आणखी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने करीत असतात. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येणे व देशाच्या पश्चिम सीमेवर चीन-पाकिस्तान आघाडीवरील नवीन आव्हानांच्या सध्याच्या काळात चौधरी यांच्याकडे हवाई दलाची सर्वोच्च सूत्रे येणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

loading image
go to top