International Anti-Corruption Day : अंतुले ते कलमाडी भारतातील सर्वाधिक चर्चित घोटाळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anti-Corruption Day

International Anti-Corruption Day : अंतुले ते कलमाडी भारतातील सर्वाधिक चर्चित घोटाळे

International Anti-Corruption Day : आज जागतिक भ्रष्टाचार निर्मूलन दिवस साजरा केला जात आहे. जगभरातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी जगभरातील विविध देशांममध्ये अनेक कायदे आहेत. जगात भारतातील घोटाळ्यांचा इतिहास खूप मोठा आहे, तितकीच या घोटाळ्यांची यादीही मोठी आहे. पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये जुन्या घोटाळ्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आज भारतातील सर्वाधिक चर्चित घोटाळे आज आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Pension scam: महिला कर्मचाऱ्यांकडून झालेला लाखोंचा घोटाळा समोर; समितीकडून तपासणी सुरू

हर्षद मेहता घोटाळा (1992) : 1992 मध्ये हर्षद मेहता यांनी फसवणूक करून बँकांचे पैसे शेअर बाजारात गुंतवले, त्यामुळे शेअर बाजाराला सुमारे 5000 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.

चारा घोटाळा (1996) : बिहारमध्ये 1996 मध्ये झालेल्या चारा घोटाळ्याने देशात खळबळ उडवून दिली होती. या घोटाळ्याचे सूत्रधार बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव होते. सध्या ते या प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

दूरसंचार घोटाळा : काँग्रेस नेते सुखराम शर्मा, जे तत्कालीन दूरसंचार मंत्री होते, त्यांच्यावर हैदराबाद-आधारित खाजगी कंपनीला निविदा जिंकण्यात मदत केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे सरकारचे 1.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले. 2002 मध्ये त्यांना या प्रकरणी तुरुंगातही जावे लागले होते.

युरिया घोटाळा : नॅशनल फर्टिलायझर कंपनीचे एमडी सीएस रामकृष्णन, नरसिंह राव यांच्या निकटवर्तीयांसह इतर अनेक व्यावसायिकांनी दोन लाख टन युरिया आयात करून सरकारची 133 कोटी रुपयांची फसवणूक केली. हा युरिया भारतात कधीच पोहोचू शकला नाही.

हवाला घोटाळा : या घोटाळ्यामुळे देशाबाहेर पैसे पाठवण्याशी संबंधित प्रकरणाशी सामान्य भारतीयांची ओळख झाली. 1991 मध्ये सीबीआयने अनेक हवाला ऑपरेटर्सच्या जागेवर छापे टाकले. या छाप्यात एसके जैन यांची डायरी जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा: Nirav Modi PNB Scam : नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, यूके कोर्टाने फेटाळली याचिका

तहलका घोटाळा : तहलका या मीडिया हाऊसने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काही वरिष्ठ नेत्यांनी संरक्षण सौद्यांमध्ये कशी फसवणूक केल्याचे उघड झाले होते. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांमध्ये लोकांनी लाच घेताना पाहिले होते. या घोटाळ्यात तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल सुशील कुमार यांचीही नावे समोर आली होती. यानंतर जॉर्ज यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मॅच-फिक्सिंग : 2000 मध्ये पहिल्यांदा भारतीय खेळाडूंवर क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचे आरोप झाले. यामध्ये अझरुद्दीन आणि अजय जडेजा यांची नावे ठळकपणे समोर आली होती. त्यानंतर अजय शर्मा आणि अझहरवर आजीवन तर जडेजा आणि मनोज प्रभाकरवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

यूटीआय घोटाळा : आरोपांनुसार 48,000 कोटी रुपयांचा हा घोटाळा यूटीआयचे माजी अध्यक्ष पीएस सुब्रमण्यम आणि दोन संचालक एमएम कपूर आणि एसके बसू यांनी संयुक्तपणे केला होता. या सर्वांना अटक झाली, पण कोणालाही शिक्षा झाली नाही.

आदर्श घोटाळा : आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटी (लि.) ने कुलाब्याच्या निवासी भागात नेव्ही नगर आणि डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटच्या आजूबाजूला बेकायदेशीरपणे इमारत बांधली. ही योजना कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बनवण्यात आली होती, यातील 80 टक्के फ्लॅट नागरीकांना देण्यात आले होते. या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता.

आयपीएल घोटाळा : आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी यांना आर्थिक अनियमिततेमुळे आयपीएल-3 संपल्यानंतर लगेचच पदावरून निलंबित करण्यात आले. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. मोदींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. आयपीएलमध्ये 1200 ते 1500 कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे. या घोटाळ्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवरही बंदी घालण्यात आली होती.

हेही वाचा: Barshi's Harshad Mehta|दहा लाख गुंतवा; वर्षात सहा कोटी हसत न्या,बार्शीच्या`हर्षद मेहता`च्या करामती |पाहा व्हिडिओ

मुद्रांक घोटाळा : खोटे शिक्के बनवून अब्दुल करीम तेलगीने देशाची 20,000 कोटी रुपयांची फसवणूक केली. या घोटाळ्याची विशेष बाब म्हणजे तेलगीला सरकारचे पूर्ण सहकार्य मिळाले, त्यामुळेच त्याने मोठया प्रमाणात घोटाळा करण्याची हिम्मत दाखवली.

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा : या प्रकरणात सुमारे 70 हजार कोटींचा घोटाळा समोर आला होता. या प्रकरणात आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नावे प्रामुख्याने समोर आली होती.

2G स्पेक्ट्रम घोटाळा : या संपूर्ण प्रकरणात देशाच्या तिजोरीचे 176 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी दळणवळण मंत्री ए.के. राजाला जबाबदार धरण्यात आले. डिसेंबर 2017 मध्ये सीबीआय कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आणि हा खटला चुकीचा असल्याचे सांगितले.

विजय मल्ल्या प्रकरण : विविध बँकांच्या 9000 कोटी रुपयांच्या कर्ज बुडवल्याप्रकरणी तपास सुरू झाल्यानंतर न्यायालयाने फरार घोषित केलेला विजय मल्ल्या सध्या यूकेमध्ये राहत आहे.

PNB घोटाळा : नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoU) द्वारे पंजाब नॅशनल बँकेत 11,300 कोटी रुपयांचा घोटाळा केला. देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यानंतर दोघेही फरार आहेत.