#InternationalCoffeeDay: कॉफीविषयी जाणून घ्या 'या' सात गोष्टी

वृत्तसंस्था
Tuesday, 1 October 2019

कॉफीच्या चाहत्यांसाठी हा खास दिवस आहे कारण, आज आहे 'आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस'. सकाळच्या वाचकांना कॉफी दिनाच्या शुभेच्छा.

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसं फक्त कामाच्या मागे धावताना दिसतात. बदलती जीवनशैली, कामाचा व्याप आणि थकान यामध्ये शरीराला सवय लागते ती कॉफी किंवा चहाची. अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते ती कॉफीने, कपलच्या डेट सुरु होतात त्या कॉफीने आणि स्ट्रेस दूर करण्यासाठी मदत होते ती कॉफीची! जितके चहाचे चाहते आहेत तितकेच कॉफीलवर देखील आहेत. कॉफीच्या चाहत्यांसाठी खास दिवस आहे कारण, आज आहे 'आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस'. सकाळच्या वाचकांना कॉफी दिनाच्या शुभेच्छा. या खास दिनानिमित्त आम्ही तुम्हाला कॉफीविषयी सात टिप्स देणार आहोत.

1. शरीरासाठी कॉफी चांगली की वाईट याविषयी अनेक प्रश्न उठवले जातात. आरोग्य तज्ञांच्या मते दिवसांतून 3 ते 4 वेळा क़ॉफीचं सेवन करणे योग्य आहे. मात्र जर तुम्ही त्यापेक्षा जास्त कॉफी घेत असाल तर ते शरीरासाठी हानिकारक ठरु शकतं. कॉफीमध्ये कॅफीनच्या शिवाय अॅंटीऑक्सीडंट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. मात्र गरजेपेक्षा जास्त कॉफी घेतल्याने शरीराला त्रासदेखील होतो.

2. कॉफीमध्ये 'कॅफीन' असतं. कॅफीन म्हणजे चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य होय. त्यामुळे शरीरातलं मेटाबॉलिजम वाढतं. अतिरिक्त कॅलरी आणि फॅट कमी करण्यास कॅफीनची मदत होते.

3. डोळ्याभवतीची काळी वर्तृळं कमी करणण्यासाठी कॉफी उपयुक्त आहे. कॉफीमध्ये खोबरेल तेल टाकुन हे मिश्रण अंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्यावर लावावे. डोळ्याभोवतील काळी वर्तृळ कमी होण्यास मदत होईल. शिवाय खोबरेल तेलाने कोरड्या चेहऱ्याला पोषण मिळते.

4. एका रिसर्चमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, कॉफी पिल्याने मेंदू अॅक्टीव राहतो आणि पार्किन्सन रोगापासून बचाव होतो.

5. कॉफीच्या सेवनाने शरीरातील 'एड्रेनालाईन' नामक हार्मोनची पातळी वाढते. त्यामुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते. आपोआपचं तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहू शकता.

6. त्यामधील अॅंटीऑक्सीडंट्स आणि शरीरातील रक्ताभिसरण नियंत्रीत राहण्यास मदत होते. स्ट्रोक्सचा धोका काही प्रमाणात कमी होतो.

7. इटली आणि मिलान या देशांमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार कॉफी पिल्याने कर्करोग आणि यकृतासंबंधीत्या समस्या होण्याची शक्यता कमी होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Coffee Day know these few facts about coffee