esakal | दिल्ली ठप्प; इंटरनेटसेवा बंद, मेट्रोवरही परिणाम; CAA विरोधात आंदोलन तीव्र
sakal

बोलून बातमी शोधा

internet suspended in some part of delhi caa protest gets violent

दिल्लीत आज पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं असून, लाल किल्ला परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दिल्ली ठप्प; इंटरनेटसेवा बंद, मेट्रोवरही परिणाम; CAA विरोधात आंदोलन तीव्र

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीत करण्यात येत असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. पोलिसांनी आज, अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं असून, लाल किल्ला परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्ली शहराच्या अनेक भागांत इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, कायद्या विरोधात आंदोलन करणारे स्वराज्य इंडिया संघटनेचे योगेंद्र यादव यांनाही पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योगेंद्र यादवांचा आरोप
दिल्लीत लालकिल्ला परिसरात आंदोलन करणारे स्वराज्य इंडिया संघटनेनेच योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याची माहिती स्वतः योगेंद्र यादव यांनीच ट्विटरच्या माध्यमातून दिली. आंदोलनात अटक झाल्याचा अभिमान असल्याचं यादव यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. योगेंद्र यादव म्हणाले, 'पोलिसांनी ताब्यात घेतलंय याचा अभिमान आहे. अश्फकुल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांना आंदरांजली. मला आणि पयिलालाची माजी खासदार डॉ. धर्मवीर गांधी यांना अटक अटक झाली आहे.' बेंगळुरूमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनीताब्यात घेतल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी केलाय. विद्यार्थी, लेखक, कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. पण, तेथे शांततेत आंदोलन सुरू होते, अशी माहिती यादव यांनी ट्विटरवरून दिलीय. 

आणखी वाचा - फडणवीसांच्या भारुडाला, उद्धव ठाकरेंचे भारुडानेच उत्तर 


काय सुरू आहे दिल्लीत?
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एसएमएस आणि इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून अफवा पसरवण्यात येत आहेत. त्यामुळं ही सेवा बंद करण्यात येत असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. दिल्लीतील मेट्रोची 18 स्टेशन्स सध्या बंद आहेत. त्यामुळं निम्मी दिल्ली ठप्प झाली आहे. लाल किल्ला परिसरात जमाव बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तर,  दिल्लीच्या उत्तर आणि मध्ये परिसरात मंडी हाऊस, शीलामपूर, जाफराबाद, मुस्तफाबाद, जामीया नगर, शाहीन बाग बवाना, परिसरता सध्या एमएमएस आणि इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.