Interpol : ‘इंटरपोल’च्या नाेटिसीत आता ‘सिल्व्हर’ची भर; प्रायोगिक उपक्रमात भारताचाही सहभाग
Delhi News : इंटरपोलने सिल्व्हर नोटिशीची घोषणा केली आहे, ज्यामुळे फरारी गुन्हेगारांना पकडण्यात मदत होईल. भारतासह ५२ देश या प्रायोगिक उपक्रमात सहभागी आहेत.
नवी दिल्ली : एखादा गुन्हा करून परदेशात फरारी झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी इंटरपोलकडून नोटीस जारी केली जाते. आता इंटरपोलच्या विविध रंगांच्या नोटिशींमध्ये सिल्व्हर नोटिशीची भर पडली आहे.