दिवसाढवळ्या लाेकशाहीचा खून : रणदीप सुरजेवाला

ran.jpg
ran.jpg

नवी दिल्ली ः आईएनएक्स मिडिया केस प्रकऱणावरून देशाचे  माजी वित्त मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केल्यानंतर काॅग्रेस पक्ष त्यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. काॅग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज प्रेस काॅन्फरन्स घेऊन सगळा पक्ष त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.

तसेच सरकार ही कारवाई व्यक्ती व्देषातून करत असल्याचा थेट आराेप सुरजेवाला यांनी केला. तसेच ते पुढे म्हणाले या सरकारने दिवसाढवळ्या लाेकशाहीची हत्या कली आहे. 

रणदीप सुरजेवाला म्हणाले, सीबीआयकडे कुठलाही पुरावा नसताना एका हत्याआराेपीच्या जबाबावरून ही अटक करण्यात आली आहे. या प्रकऱणात चिदंबरम यांना विनाकारण गाेवण्यात आले आहे. सीबीआयने कुठल्याही प्रकारची चार्जशीट दाखल केलेली नाही, मी माेदी सरकारला विचारताे की, देशाचे माजी वित्तमंत्री पळपुटे आहेत का?

जनतेचे लक्ष हटविण्यासाठी कारवाई - देशातील महत्वाच्या असणार्या मुख्य मुद्द्यावरून सामान्य जनतेचे लक्ष हटविण्यासाठी कारवाई केली असल्याचे त्यांनी यावेळी संगितले. रुपयाचे अवमुल्यन, तरुणांच्या नाेकर्यांचा प्रश्न, प्रत्येक क्षेत्रात सध्या मंदी आहे; सरकार या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी अशी कटकारस्थाने करत आहे. चिदंबरम याविषयांबाबत सरकारला धारेवर धरत आहेत, त्यामुळेच सरकार असा व्यक्तीव्देश करत आहे. 2017 मधील असणार्या केसबाबत 2019 मध्ये अटक केली जात आहे, चार्जशीटमध्ये त्यांचे नाव नसतानाही त्यांना अटक करणे हे अंत्यत चुकीचे आहे. माेदी सरकार देशाच प्रश्न साेडविण्याला प्राधान्य न देता सुडाचे राजकारण करत आहे. या प्रकरणात न्यायपालिका निश्चित सत्याच्या बाजूने उभी राहिल व चिदंबरम यांना न्याय मिळेल काॅग्रेस पक्ष त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com