
Brij Bhushan Sharan Singh : IOA चं मोठं पाऊल; बृजभूषण यांच्यावरील आरोपांसंदर्भात घेतला 'हा' निर्णय
नवी दिल्लीः भारतीय ऑलिम्पिक संघाने (IOA) WFI प्रमुख बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समिती गठीत केली आहे.
या सदस्यांमध्ये मेरी कोम, डोल बॅनर्जी, अलकानंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव यांच्यासह दोन वकिलांचा समावेश आहे.
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचाः मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
जोपर्यंत लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत एकही खेळाडू आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका महिला कुस्तीपटूंनी घेतली आहे. दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात या खेळाडूंचं निषेध आंदोलन सुरु आहे.
हेही वाचा: Won Lottery : चाळीस वर्षे तिकिटं खरेदी केली... 88व्या वर्षी 5 कोटींची लॉटरी लागली
विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक ऑलिम्पिकपटू सध्या दिल्लीतील जतंरमंतर मैदानात १८ जानेवारीपासून आंदोलनाला बसले आहेत. यामध्ये विनेश फोगाटनं बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचं आणि महिला प्रशिक्षकांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसेच जोपर्यंत बृजभूषण सिंह यांच्यासह फेडरेशनमधील इतर आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत एकही कुस्तीपटू आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
याप्रकरणी आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. बृजभूषण सिंग यांच्या समितीमार्फत कसून तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावरील आरोपांची खातरजमा करुन कारवाई होऊ शकते.