

Who is IPS Mohita Sharma?
esakal
IPS officer Mohita Sharma: आयपीएस मोहिता शर्मा यांची कहाणी संघर्ष, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेल्या दृढनिश्चयाची आहे. आयुष्यात आलेल्या सलग अपयशांमुळे खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर यूपीएससी परीक्षेत यश मिळवत भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. विशेष म्हणजे, यूपीएससीच्या पाचव्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या मोहिता शर्मा यांनी पुढे लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’च्या बाराव्या पर्वात तब्बल १ कोटी रुपयांची रक्कम जिंकत आपल्या ज्ञानाचीही छाप पाडली.