वीरप्पनला ठार करणारा अधिकारी 'मिशन काश्मीर'वर!

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

श्रीनगर: कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याला ठार करणाऱा अधिकारी आयएएस बीवीआर सुब्रमण्यम यांची जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाने पीडीपीचा पाठिंबा काढत सरकारमधून बाहेर पडल्यानंतर तिथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत.

जम्मू-काश्मीर दहशतवादी कारवायांमुळे अस्थिर झाले असून, या कारवायांना उत्तर देण्यासाठी  सरकारने हालचाली वाढवल्या आहेत. त्यासाठीच सरकारने जम्मू काश्मीरमध्ये बडे अधिकारी आणण्याचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगड केडरचे वरिष्ठ आयएएस बीवीआर सुब्रमण्यम यांना जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्त केले आहे. राज्यपालांचे सल्लागार म्हणून आयपीएस विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीवीआर सुब्रमण्यम आणि विजयकुमार हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.

कोण आहेत विजयकुमार?
कुख्यात चंदन तस्कर म्हणून वीरप्पनची ओळख झाली होती. चंदनासह हत्तीच्या दातांच्या तस्करी आणि अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्त्यांमुळे वीरप्पनची मोठी दहशत होती. सरकारने त्याला पकडण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च केले होते. तब्बल तीन राज्यांचे पोलिस वीरप्पनच्या मागावर होते. मात्र IPS विजयकुमार यांनी ऑपरेशन कोकून अंतर्गत 18 ऑक्टोबर 2004 रोजी वीरप्पनचा खात्मा केला होता.  विजयकुमार 1975 मध्ये तामिळनाडू केडरमधून आयपीएस झाल्यानंतर, त्यांनी स्पेशल सिक्युरिटी ग्रुपमध्ये सेवेला सुरुवात केली आहे.

वीरप्पनला जोपर्यंत मारणार नाही, तोपर्यंत डोक्याचे केस कापणार नाही, अशी शपथ विजयकुमार यांनी बन्नारी अम्मान मंदिरात घेतली होती. 18 ऑक्टोबर 2004 रोजी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तामिळनाडूतील धरमपुरी जंगलात झालेल्या ऑपरेशन ‘कोकून’ चकमकीत वीरप्पनला ठार केले होते. ‘वीरप्पन चेंजिंग द ब्रिगांड’ हे पुस्तक विजय कुमार यांनी लिहिले असून, या पुस्तकात त्यांनी वीरप्पनच्या बालपणापासून ते डाकू बनण्यापर्यंतचा प्रवास लिहिला आहे.

Web Title: ips officer bvr subrahmanyam and vijay kumar appointe to jammu kashmir