बलात्कारी आरोपीला सौदीत जाऊन घातल्या बेडया

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

कोल्लमच्या पोलिस आयुक्त मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीमने बलात्कार प्रकरणात देशाबाहेर फरार झालेल्या आरोपीला पकडून भारतात आणले आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सुनील कुमार भाद्रान (38) सौदी अरेबियाला पळून गेला होता. रविवारी मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीम त्याला आणण्यासाठी सौदीला रवाना झाली.

तिरुअनंतपुरम : कोल्लमच्या पोलिस आयुक्त मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीमने बलात्कार प्रकरणात देशाबाहेर फरार झालेल्या आरोपीला पकडून भारतात आणले आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सुनील कुमार भाद्रान (38) सौदी अरेबियाला पळून गेला होता. रविवारी मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीम त्याला आणण्यासाठी सौदीला रवाना झाली.

मूळचा कोल्लमचा असलेला सुनील कुमार सौदी अरेबियात टाइल कामगार म्हणून नोकरी करायचा. सुट्टीमध्ये सुनील कुमार केरळमध्ये आला होता. त्यावेळी त्याने मित्राच्या पुतणीचे तीन महिने लैंगिक शोषण केले. वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या पीडित मुलीने अखेर तिच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले. सौदीमधून गुन्हेगाराला आणण्याच्या प्रक्रियेत कितीही अडथळे आले तरी सुनील कुमारला घेऊनच भारतात परतण्याचा निर्धार मेरीन जोसेफ यांनी केला होता आणि त्यांनी तो त्यांनी पूर्ण केला आहे.

पोलिसांनी सुनील नोटीस जारी करुनही तो सौदी अरेबियाला पळून गेला होता. जून 2017 मध्ये मुलीने आपले आयुष्य संपवले. त्याआधी मुलीच्या काकांनी ज्यांनी सुनील कुमारची कुटुंबाबरोबर ओळख करुन दिली होती. त्यांनी सुद्धा आत्महत्या केली. मेरीन जोसेफ यांनी जून 2019 मध्ये कोल्लमच्या पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेत असताना महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत.

जोसेफ म्हणाल्या की,  आरोपीला पकडण्यासाठी खास प्रयत्न केले. 2017 सालीच सुनील कुमार विरोधात इंटरपोलने नोटीस जारी केली आहे. पण त्यात फारशी प्रगती झालेली नव्हती. केरळमध्ये गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेले अनेकजण सौदीला पळून गेले आहेत. अनेक आयपीएस अधिकारी परदेशात आरोपीला अटक करायची असेल तर ज्युनिअर अधिकाऱ्यांना निवडतात पण जोसेफ यांनी स्वत: जाण्याचा निर्णय घेतला आणि आरोपीला पकडून भारतात आणले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPS officer Merin Joseph hailed for arresting Kerala child rapist in Saudi