esakal | सुबोध कुमार जयस्वाल CBIचे नवे प्रमुख; पदभार स्वीकारला
sakal

बोलून बातमी शोधा

IPS Subodh Kumar Jaiswal

सीबीआय प्रमुख ऋषीकुमार शुक्ला यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ ३ फेब्रुवारीला पूर्ण झाला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.

सुबोध कुमार जयस्वाल यांनी CBI प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : IPS सुबोध कुमार जयस्वाल (IPS Subodh Kumar Jaiswal) यांनी बुधवारी (ता.२६) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CBI) प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. जयस्वाल हे १९८५च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेचे (IPS) अधिकारी आहेत. सीबीआयच्या प्रमुख पदी विराजमान होण्याआधी ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF)चे महासंचालक होते. तसेच त्यांनी याआधी महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदही भूषविले आहे. सीबीआय प्रमुख ऋषीकुमार शुक्ला यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ ३ फेब्रुवारीला पूर्ण झाला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. आणि सीबीआय प्रमुखांविना कामकाज चालू होते. (IPS Subodh Kumar Jaiswal takes charge as the Director of CBI)

हेही वाचा: रामदेव बाबा अडचणीत, IMA नं पाठवली 1 हजार कोटींची मानहानीची नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमणा आणि कॉंग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. १९८५च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरमधील आयपीएस अधिकारी ते महाराष्ट्राचे महासंचालक आणि आता सीबीआय प्रमुख अशी कारकीर्दीचा आलेख उंचावणारी कामगिरी जयस्वाल यांची आहे. जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यापासून पुढील दोन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी त्यांची नियुक्ती असणार आहे.

महाराष्ट्र एटीएस प्रमुख, देशाची प्रमुख गुप्तचर संस्था 'रॉ'मध्ये अनेक महत्त्वाच्या मोहिमांत सहभाग, तेलगी घोटाळा ते मालेगाव बॉम्बस्फोट, २६/११ हल्ला यांच्या तपासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.