Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा, तणाव वाढला!

India Condemns Iran Attack on Cargo Ship Bound for Gujarat Near Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीत गुजरातकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजावर इराणचा हल्ला; दोन भारतीयांचा मृत्यू, भारत सरकारचा तीव्र निषेध आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुरक्षेबाबत गंभीर चिंता
India Condemns Iran Ship Attack Near Strait of Hormuz; Indian Crew Among Victims

India Condemns Iran Ship Attack Near Strait of Hormuz; Indian Crew Among Victims

esakal

Updated on

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले थांबवण्याची मागणी भारताने केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत थायलंडच्या ‘मयुरी नारी’ या मालवाहू जहाजावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने केलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे जहाज गुजरातच्या कांडला बंदराकडे जात असताना बुधवारी सकाळी हल्ल्यात सापडले. परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध करताना म्हटले की, अशा प्रकारचे हल्ले व्यावसायिक जहाजांना, निरपराध क्रू सदस्यांना आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण करतात. पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी भारताने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com