

Did the US Use Indian Bases to Strike Iran? India Issues Strong Denial
esakal
मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष सध्या तीव्र स्वरूप धारण करत असताना, एका माजी अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने केलेल्या विधानाने भारताला केंद्रस्थानी आणले आहे. माजी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी वन अमेरिका न्यूज नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सर्व लष्करी तळांचा नाश झाल्याने आता इराणवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेला भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, भारत सरकारने या विधानाला पूर्णपणे फेटाळून लावले आहे.