

तेहरान : इराणच्या सात अटी पूर्ण होईपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका इराणच्या संसदेचे अध्यक्ष महंमद बाघेर गालिबाफ यांनी रविवारी मांडली. अमेरिकेशी वाटाघाटी आणि लष्करी कारवाई यापैकी एकाची निवड करण्याऐवजी योग्य वेळी दोन्ही मार्गांचा अवलंब केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.