Mallikarjun Kharge : ‘आप’ आणि ‘भाजप’चे साटेलोटे आहे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खर्गे यांची विचारणा
Kisan Andolan : शंभू आणि खनौरी सीमेवरून शेतकऱ्यांना हटवल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आप-भाजपच्या साटेलोट्याचा सवाल उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पक्ष आणि भाजप या पक्षांनी शेतकऱ्यांविरोधात साटेलोटे केले आहे का? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शंभू तसेच खनौरी सीमेवरून शेतकऱ्यांना हटविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला.