Isha Ambani Baby Name : ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांच्या हटके नावांचा अर्थ माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Isha Ambani Baby Name

Isha Ambani Baby Name : ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांच्या हटके नावांचा अर्थ माहितीये?

Isha Ambani Baby Name : रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने १९ नोव्हेंबरला जुळ्या मुलांना जन्म दिला. ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या जुळ्या मुलांची नावं आदिया आणि कृष्णा आहेत. त्यांच्या कुटुंबाने या मुलांची नावं जाहिर केली. अंकज्योतिषानुसार या मुलांच्या नावांचा अर्थ काय होतो, जाणून घ्या.

Isha Ambani and Anand Piramal

Isha Ambani and Anand Piramal

आदिया नावाचा अर्थ

ईशा अंबानीच्या मुलीचं नाव आदिया ठेवण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ सुरवात किंवा पहिली शक्ती असा होतो. आदियाचा मुलांक ५ आहे. अंकज्योतिष्य ५ नुसार आदियाचा अर्थ प्रगती प्रिय, मजबूत, दूरदर्शी, साहसी, स्वतंत्र प्रेमी, बेचैन आणि अध्यात्मिक असा होतो.

कृष्णा नावाचा अर्थ

ईशा अंबानीच्या मुलाचा अर्थ कृष्णा आहे. ज्याचा अर्थ प्रेम, शांती आणि स्नेह आहे. कृष्णाचा मुलांक ८ आहे. अंकज्योतिषानुसार ८ नुसार कृष्णाचा अर्थ प्रेमी, शक्ती प्राप्त करणारा, भौतिकवाद, आत्मनिर्भर आणि ध्येय पुर्ण करणारा असा होतो. तसंच कृष्णा भगवान विष्णूचं नाव आहे.

numerology

numerology

मुलांक ५ असाणारे लोकांची खासियत

मुलांक ५ असणारे लोक सकारात्मक विचारांवर लक्ष देणारे असतात. कोणत्याही कामासाठी हे फार उत्साही असतात. प्रत्येक क्षेत्राची यांना माहिती असते. मल्टीटास्कींग असतात. उत्तम निर्णय क्षमता असते. हे लोक फार घाईत असतात. यांना मनोरंजनाची आवड असते. हे लोक हुशार आणि चतुर असतात. आपल्या कामात यांना कोणाचा हस्तक्षेप आवडत नाही.

मुलांक ८ असणाऱ्या लोकांची खासियत

मुलांक ८ असणारे लोक मॅनेजमेंट मध्ये उत्तम असतात. ते सर्वच कामं करू शकतात. यांना माणसं ओळखता येतात. सामाजिक कार्यात यांना रस असतो. मोटमोठी कामं एकट्याने हाताळू शकतात. या लोकांनी जागरूक राहून वाटचाल करावी. यांना उच्च पदावरच काम करायला आवडते. कोणाच्या हाताखाली काम करू शकत नाही.

टॅग्स :mukesh ambaniAmbani