Israel Gaza War: इस्राईलकडून गाझामध्ये बाँबवर्षाव; हवाई हल्ल्यांमध्ये १३२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
शनिवारी रात्री सुरू झालेला बाँबवर्षाव आज सकाळी थांबल्यानंतर येथील खान युनिस येथील रुग्णालयात ४८ मृतदेह आणण्यात आल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. मृतांमध्ये १८ बालके आणि १३ महिला होत्या. तसेच, गाझा पट्टीच्या उत्तर भागातही निर्वासितांच्या छावणीवर झालेल्या बाँबहल्ल्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला.
देर अल बाला : शांतता आणि शस्त्रसंधीसाठीचे सर्व प्रयत्न धुडकावून लावणाऱ्या इस्राईलने शनिवारी रात्री गाझा पट्टीत केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यांमध्ये १३२ जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत.