धक्कादायक ! इस्रोच्या वैज्ञानिकाची घरामध्ये घुसून हत्या

वृत्तसंस्था
Wednesday, 2 October 2019

इस्रोचे वैज्ञानिक एस.सुरेश यांची हैदराबादमध्ये हत्या झाली आहे. हैद्राबादमधील अमीरपेठ भागातील अन्नपूर्णा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये एस. सुरेश मंगळवारी मृतावस्थेत आढळले. त्यांची हत्या झाली असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली : इस्रोचे वैज्ञानिक एस.सुरेश यांची हैदराबादमध्ये हत्या झाली आहे. हैद्राबादमधील अमीरपेठ भागातील अन्नपूर्णा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये एस. सुरेश मंगळवारी मृतावस्थेत आढळले. त्यांची हत्या झाली असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

अज्ञात आरोपीने त्यांची घरात घुसुन हत्या केली आहे. सुरेश हे मूळ केरळचे असून हैदराबादमध्ये ते एकेटच राहत होते. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर विभागात ते कार्यरत होते. मंगळवारी सुरेश कामावर आले नाहीत त्यावेळी सहकाऱ्यांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. इस्रोमधल्या सहकाऱ्यांनी सुरेश यांच्या पत्नी इंदिराला फोन करुन याबद्दल माहिती दिली. सुरेश यांच्या पत्नी कुटुंबियांसह लगेच हैदराबादमध्ये पोहोचल्या व पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तेव्हा सुरेश मृतावस्थेत आढळून आले. एका जड वस्तूने त्यांच्या डोक्यात प्रहार केल्यामुळे सुरेश यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, सुरेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी पुढील तपासासाठी घराचा ताबा घेतला असून सुरेश यांच्या हत्येमागचे कारण अजून समजू शकले नाही. परंतु सुरेश यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. सुरेश गेल्या २० वर्षांपासून हैदराबादमध्ये राहत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISRO employee found murdered in Hyderabad