
प्रदूषणासारख्या विषयांवर चर्चा होणे गरजेचे: आदित्य ठाकरे
नवी दिल्ली : देशात हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. यांसह देशासमोरील महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. या चर्चेतून खूप काही चांगले होऊ शकते. त्यामुळे देश आणि राज्यांनाही चांगली दिशा मिळू शकते. त्यामुळे ‘रायसीना डायलॉग’सारखी चर्चा राज्यासाठी महत्त्वाची आहे, असे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दोन कोटी महिलांनी डिजिटल साक्षरता प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती दिली.
राजधानीत रायसीना डायलॉगमध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले, की राज्यासाठी अशी चर्चा होणे महत्त्वाचे असते. हिंद-प्रशांत क्षेत्राच्या विकासाबाबत चर्चा झाली. दरम्यान, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान हे ग्रामीण भागातील नागरिकांना सक्षम करण्यासाठीची योजना आहे.
Web Title: Issues Like Pollution Need Discussed Discussions Like Raisina Dialogue Important State Aditya Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..