रॉबर्ट वाड्रांच्या कार्यालयात पोहोचली आयकर विभागाची टीम

टीम ई सकाळ
Monday, 4 January 2021

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या दिल्लीतील कार्यालयाl आयकर विभागाचे पथक पोहोचलं आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या दिल्लीतील कार्यालयाl आयकर विभागाचे पथक पोहोचलं आहे. रॉबर्ट वाड्रा यांची साक्ष घेण्यासाठी आयकर विभाग गेला असल्याचं समजते. वाड्रा आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित काही निनावी मालमत्तांच्या प्रकरणी त्यांचा जबाब नोंदवला जाईल. 

आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साउथ इस्ट दिल्लीतील सुखदेव विहार इथल्या कार्यालयात वाड्रा यांचा जबाब घेतला जाणार आहे. याआधीही आयकर विभागाने वाड्रा यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र त्यावेळी कोरोना व्हायरसचे कारण देत जबाब नोंदवता आला नव्हता. 

सक्तवसुली संचालयालयाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय भंडारी यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा सीबीआयकडील एका प्रकरणाच्या आधारे दाखल केला होता. यामध्ये तपास संस्थेनं त्याच महिन्यात ओनजीसी, संजय भंडारींसह काही अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IT dept record statement of Robert Vadra in Benami Property Case