मंत्रिपद गेलं तरी मला फरक पडत नाही; नितीन गडकरींचा व्हिडीओ व्हायरल

नितीन गडकरींची पार्लमेंटरी बोर्डातून एक्झिट हा सगळ्यात मोठा शॉक मानला जात आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari esakal

भाजपच्या संघटनात्मक पातळीवरच्या महत्वाच्या नेमणुका नुकत्याच जाहीर झाल्या. त्यामध्ये नितीन गडकरींची पार्लमेंटरी बोर्डातून एक्झिट हा सगळ्यात मोठा शॉक मानला जात आहे. याची चर्चा देशासह राज्यभर सुरू असतानाच गडकरींचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये त्यांनी मंत्रिपद गेलं तरी मला फरक पडत नाही असे विधान केलं आहे. (It Doesnt Matter To Me Even If I Lose The Post Of Minister Says Nitin Gadkari Video Goes Viral)

काँग्रेस नेते अतुन लौंढे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नितीन गडकरींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'तुम्हाला शक्य असेल तर माझ्या सोबत उभे रहा. नाही राहिला तरी हरकत नाही. मंत्रीपद गेले तरी चालेल. मी राजकीय पटलावर नाही. मी एक सामान्य व्यक्ती आहे. फुटपाथवर खाणारा थर्ड क्लासमध्ये पिक्चर पाहणारा आणि पडद्यामागून नाटक पाहणाऱ्यांमधून मी मोठा झालो आहे. मला ते जीवन खुप भारी वाटते. जेव्हा झेड प्लस सक्युरिटी सोडून मी फुटपाथवर निघून जातो' गडकरी यांनी म्हटले आहे.

दोनदिवसांपूर्वी, या समितीत काही नवीन लोकांना संधी मिळाली आहे तर, काही जुन्या नेत्यांची नावे कमी केली आहेत. संसदीय समितीमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नावे हटवण्यात आली आहेत.

https://www.kooapp.com/koo/nitin.gadkari/b4534b35-6b1d-4e48-9279-d59b9be7b1d0

संसदीय समितीचे अध्यक्ष जे.पी.नड्डा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा या समितीत समावेश आहे. तर, बीएस येदयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बीएल संतोष (सचिव) सुद्धा या समितीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com