Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

सध्याच्या आभासी जगात बालकांना ‘योग्य स्पर्श, अयोग्य स्पर्श’ एवढेच शिकवून पुरेसे नाही
Facebook Fraud
Facebook Fraudesakal

नवी दिल्ली : सध्याच्या आभासी जगात बालकांना ‘योग्य स्पर्श, अयोग्य स्पर्श’ एवढेच शिकवून पुरेसे नाही, तर त्यांना ‘व्हर्च्युअल स्पर्श’ आणि त्यापासून असलेल्या धोक्यांबाबतही शिक्षित करणे अत्यावश्यक आहे, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. (It is necessary to make children aware of the danger of virtual touch says Delhi High Court)

Facebook Fraud
Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राजीव या युवकाच्या आईने, म्हणजे कमलेश देवी या महिलेने केलेला जामीन अर्ज फेटाळून लावताना न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदविली. राजीव याने सोशल मीडियाच्या माध्यमातून १६ वर्षांच्या एका मुलीशी मैत्री केली आणि त्याचा गैरफायदा घेत तिचे अपहरण केले होते.

तिला मध्य प्रदेशात नेत त्याच्यावर अत्याचार केले. तिला एका व्यक्तीला विकण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणात राजीव याला त्याच्या आईनेही मदत केल्याचा आरोप आहे. तिने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. (Latest Marathi News)

Facebook Fraud
Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

"सध्याच्या आधुनिक युगात आभासी जगाकडे नवीन पिढी आकर्षित होते. मात्र, या जगातील धोक्यांचा सामना कसा करावा, याची त्यांना माहिती नसते. आभासी जगात देहविक्रय करण्यासाठी मानवी तस्करी आणि इतर गुन्हे होत असतात. त्यामुळे लहान मुला-मुलींना योग्य आणि अयोग्य स्पर्शाबाबत माहिती करून देतानाच आभासी जगातील धोक्यांची जाणीव करून देणाऱ्या ‘व्हर्च्युअल स्पर्शा’चीही जाणीव करून देणे आवश्‍यक आहे. (Marathi Tajya Batmya)

यामध्ये ऑनलाइन असताना कोणती काळजी घ्यावी, संवाद साधला जात असलेल्या व्यक्तीची संशयास्पद वागणूक ओळखणे, आपल्या खासगीपणाचे महत्त्व लक्षात ठेवणे याबाबी त्यांना समजावून सांगायला हव्यात,’’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com