esakal | Pegasus प्रकरण राज्यसभेत तापलं; सदस्यांनी मंत्र्याच्या हातातली कागदपत्रे फाडली
sakal

बोलून बातमी शोधा

Pegasus प्रकरण राज्यसभेत तापलं; सदस्यांनी मंत्र्याच्या हातातली कागदपत्रे फाडली

Pegasus प्रकरण राज्यसभेत तापलं; सदस्यांनी मंत्र्याच्या हातातली कागदपत्रे फाडली

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु आहे. आज गुरुवारी देखील पेगॅसस पाळत प्रकरणावरून संसदेमध्ये जोरदार गोंधळ झालेला पहायला मिळाला. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव या पेगॅसस पाळत प्रकरणी केंद्र सरकारची बाजू राज्यसभेत मांडण्यास उभे राहिले होते. मात्र, तेव्हा विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांना बोलू दिलं नाही. वैष्णव सरकारची बाजू मांडत असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार (TMC MP) पुढे सरसावले आणि त्यांनी मंत्र्यांच्या् हातून पेपर खेचून घेतले आणि फाडून टाकले. त्यामुळे राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे मंत्री अश्विनी वैष्णव ((IT Minister Ashwini Vaishnaw) यांना आपलं म्हणणं पूर्ण करता आलं नाही. या सगळ्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. (IT Minister Ashwini Vaishnaw Pegasus TMC MP paper from the hands of the Minister RS Monsoon Session)

यासंदर्भात बोलताना राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यांनी म्हटलंय की, विरोधकांमधील काही खासदार, खासकरुन तृणमूल काँग्रेसचे सदस्य उठले आमि त्यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातून कागदपत्रे हिसकावून घेतली आणि ती फाडली. हे पूर्णपणे असभ्य वर्तन आहे. ते पेगॅसस प्रकरणी बोलत होते. त्यांचं बोलणं पूर्ण झाल्यावर त्यांना प्रश्न विचारण्याचा तुम्हाला नक्कीच अधिकार आहे. मात्र, चर्चेचा मार्ग न अवलंबता अशाप्रकारची दमदाटी आपण आता संसदेच्या सभागृहात अनुभवणार आहोत का? हे पूर्णपणे नियमांच्या विरुद्ध आहे. मला वाटतंय याचा योग्यप्रकारे निषेध केला पाहिजे.

loading image