युवती म्हणाली, मी नव्हे तर तोच चाळे करत होता...

वृत्तसंस्था
Thursday, 19 September 2019

एका प्रेमीयुगलाचे दुचाकीवरील चाळे मोबाईलमध्ये कैद झाले अन् ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.

जबलपूर (मध्य प्रदेश): एका प्रेमीयुगलाचे दुचाकीवरील चाळे मोबाईलमध्ये कैद झाले अन् ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलल्यानंतर युवतीने मी नाही तर प्रियकरच चाळे करत असल्याची तक्रार नोंदवली.

जबलपूर पोलिसांकडे एक व्हायरल व्हिडिओ आला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये एक प्रेमीयुगल दुचाकी चालवत असताना अश्लिल चाळे करत आहे. सिग्नलला थांबल्यानंतरही त्यांचे चाळे थांबलेले दिसत नाही. प्रेमीयुगलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांनी चौकशीसाठी युवतीला ताब्यात घेतल्यानंतर ती म्हणाली, 'मी दुचाकी चालवत असताना पाठीमागे बसलेला युवक माझ्याशी अश्लिल वर्तन करत होता. शिवाय, त्याने त्याच्या मित्रांना व्हिडिओ तयार करायला सांगून व्हायरल केला आहे. युवतीने युवकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.'

जबलपूरचे पोलिस अधीक्षक अमित सिंह म्हणाले, 'सोशल मीडियावर दुचाकी चालवत असताना अश्लिल वर्तनाचे 3-4 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jabalpur police take action against couple after viral video