जयपूर: भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांनी राजस्थान विधानसभेत निवृत्तीवेतनाच्या (पेंशन) मागणीसाठी अर्ज केला आहे. माजी आमदार या नात्याने त्यांनी स्पीकर वासुदेव देवनानी यांच्याकडे हा अर्ज पाठवला आहे. स्पीकर देवनानी यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना हा अर्ज मिळाल्याची पुष्टी केली आहे. नियमांनुसार यावर निर्णय घेतला जाईल आणि सभागृहालादेखील याबद्दल माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.