जहांगीरपुरी दंगल: आणखी सहा अटकेत, १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hanuman Jayanti Violence
जहांगीरपुरी दंगल: आणखी सहा अटकेत, १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी

दिल्ली: आणखी सहा अटकेत, १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथे हनुमान जयंतीदिनी झालेल्या दंगलप्रकरणी सकाळी १४ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं आत्तापर्यंत एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यांपैकी १२ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दोन प्रमुख आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Jahangirpuri riots Six more arrested 12 accused remanded in judicial custody)

अॅड. विकास वर्मा यांनी सांगितलं की, दिल्लीतील स्थानिक रोहिणी कोर्टानं यांपैकी प्रमुख आरोपी अन्सार आणि अस्लम यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन जण अल्पवयीन आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी ३ बंदुका, ५ तलवारी जप्त केल्या आहेत.

दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी उत्तम नगर भागात गस्त वाढवली आहे.

Web Title: Jahangirpuri Riots Six More Arrested 12 Accused Remanded In Judicial Custody

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh news