

Jail Inspector Found Dead, Family Targets Senior Officials
Esakal
बंगळूर, ता. १३ : धारवाड केंद्रीय कारागृहाचे तुरुंग निरीक्षक सिद्धरामप्पा वड्डर यांच्या आत्महत्येप्रकरणी खळबळ उडाली असून, राज्य कारागृह विभागाचे महासंचालक (डीजीपी) आलोककुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सिद्धरामप्पा यांच्या मृत्यूसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेला मानसिक छळ जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून, डीजीपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.