...अन् तिने विमानात दिला बाळाला जन्म

jaipur international airport miracle in the air in indigo flight female passenger gives birth to a baby girl
jaipur international airport miracle in the air in indigo flight female passenger gives birth to a baby girl
Updated on

प्रवासादरम्यान एखाद्या स्त्रीची प्रसूती झाल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर आल्या आहेत. कधी रेल्वेमध्ये तर कधी ट्रेनमध्ये स्त्रीची प्रसूती झाल्याचंदेखील आपण पाहिलं आहे. परंतु, प्रवासात अशी एखादी घटना घडली तर संबंधित स्त्रीसोबतच सगळ्यांची एकच तारांबळ उडते. असाच एक प्रकार इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात घडला असून एका स्त्रीने हवेत उडणाऱ्या विमानात बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे विमानात प्रवास करत असलेल्या डॉक्टर शुभाना नजीर यांनी या महिलेची सुखरुप प्रसूती केली आहे. याविषयी ट्विट करत एएनआयने माहिती दिली आहे.

इंडिगो एअरलाइन्सच्या बेंगळुरू- जयपूर या विमानात एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. हे विमान लॅण्ड झाल्यावर प्रसूत झालेल्या महिलेला आणि नवजात बाळाला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केलं आहे.

डॉ. शुभाना नजीर या इंडिगोच्या विमानाने प्रवास करत असताना या विमानात असलेल्या एका प्रवासी महिलेला अचानकपणे प्रसूती कळा सुरु झाल्या. त्यानंतर शुभाना नजीर यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडत या महिलेची सुखरुपरित्या डिलेव्हरी केली. विशेष म्हणजे विमानातील कर्मचाऱ्यांनीदेखील यावेळी मदत केली.

दरम्यान, या महिलेने एका सुंदर चिमुकलीला जन्म दिला आहे. या प्रकारानंतर इंडिगोने त्याच्या कर्मचारी आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तसंच विमानातील कर्मचाऱ्यांनी या बाळासोबत फोटोदेखील काढला आहे. या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com