
पहलगामच्या हल्ल्यासंबंधात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आज काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. बैसरन पठार हे परवानगी न घेता किंवा सुरक्षा संस्थांना पूर्वसूचना न देता वेळेपूर्वी उघडल्या गेल्याच्या दाव्यावर या बैठकीत सरकारने भर दिला होता.