
नवी दिल्ली : देशातले सामाजिक सौहार्द बिघडावे, या उद्देशाने केंद्रातील भाजप सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी केला. या आठवड्यात संसदेमध्ये सरकारकडून वक्फ सुधारणा विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी आणले जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विधेयकाला असलेला विरोध तीव्र केला आहे.