
नवी दिल्ली : ट्रम्प यांनी चीन वगळता जगातील अन्य सर्व देशांवर लागू केलेल्या आयात शुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली आहे. स्थगितीच्या या काळात अमेरिकेसोबत व्यापार करार होणे हे भारतासाठी आत्यंतिक निकडीचे बनले असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी कार्नेज ग्लोबल टेक परिषदेत बोलताना केले.