esakal | जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलाला मोठे यश, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

jammu kashmir encounter main.jpg

काश्मीर झोन पोलिसांनी सुरुवातीला या ऑपरेशनमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याचे सांगितले होते. नंतर आणखी दोन दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलाला यश आले.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलाला मोठे यश, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरमधील लावेपुरा परिसरात सुरक्षादलाबरोबर झालेल्या एनकाऊंटरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. सुरक्षादलाकडून शोध मोहीम सुरु आहे. तर सुरक्षादलांनी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दब्बी गावात दहशतवाद्यांच्या एका ठावठिकाण्यावर छापा टाकून शस्त्रास्त्र, काडतूस आणि स्फोटकांचे साहित्य जप्त केले आहे. 

काश्मीर झोन पोलिसांनी सुरुवातीला या ऑपरेशनमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याचे सांगितले होते. नंतर आणखी दोन दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलाला यश आले. अजूनही शोध मोहीम सुरु आहे. दुसरीकडे सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील दब्बी गावात एका दहशतवादी ठिकाणावर छापा टाकला. त्यात मोठ्यामप्रमाणात शस्त्रास्त्र साठा, काडतुसे आणि स्फोटके जप्त करण्यात आली. रविवारी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही छापेमारी करण्यात आल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

loading image