esakal | J&K Local Polls Live Update: भाजप आणि गुपकारमध्ये 'काटे की टक्कर'; जाणून घ्या कल
sakal

बोलून बातमी शोधा

jammu1

जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीची मतगणना सुरु आहे.

J&K Local Polls Live Update: भाजप आणि गुपकारमध्ये 'काटे की टक्कर'; जाणून घ्या कल

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीची मतगणना सुरु आहे. सुरुवातीच्या कलानुसार फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्या नेतृत्वातील गुपकार (Gupkar) अलायन्सने आघाडी घेतल्याचं दिसत आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसह (PDP) अन्य स्थानिक पक्षांना 81 जागांवर आघाडी प्राप्त झाली आहे. दुसरीकडे भाजपला 47 जागांवर  आहे. काँग्रेस 21 जागांवर पुढे आहे. 

लाईव्ह अपडेट-

-श्रीनगरमधील 14 जागांपैकी, 7 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकले आहेत. अपनी पार्टीला 3 जागा मिळाल्या आहेत. भाजप, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. 

--आम्ही अनेक जागांवर आघाडीवर आहोत. जम्मू-काश्मीरच्या लोकांना विकास हवा आहे, हे यावरुन स्षष्ट होतं, असं भाजप नेता शहानवाज हुसैन म्हणाले आहेत
 

जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीसाठी (DDC Election) 2,178 उमेदवार मैदानात आहेत. डीडीसीच्या 280 जागांसाठी आठ टप्प्यामध्ये मतदान घेण्यात आले. केंद्र शासित प्रदेशाच्या 20 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 14 जागा आहे. डीडीसी निवडणुकीत भाजप आणि अन्य पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. 

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अनुच्छेद 370 हटवून जम्मू-काश्मीरला लागू असलेला विशेष दर्जा काढूण घेण्यात आला होता. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 नोव्हेंबर रोजी झाले होते आणि शेवटच्या म्हणजे आठव्या टप्प्यातील मतदान 19 डिसेंबर रोजी झाले होते. जवळपास शांतीपूर्ण पद्धतीने पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण 57 लाख मतदारांपैकी 51 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

काश्मीरमधील स्थानिक सात राजकीय पक्षांनी गुपकार आघाडीच्या (पीएजीडी) बॅनरखाली निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यांचाही समावेश आहे. सुरुवातीला काँग्रेसही पीएजीडीचा एक भाग होती. पण, भाजपने जोरदार टीकास्त्र चालवल्याने काँग्रेसने पीएजीडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. 

loading image