काश्मीर : 'हिज्बुल'च्या दोन दहशतवाद्यांसह पोलिस अधिकाऱ्याला अटक

वृत्तसंस्था
रविवार, 12 जानेवारी 2020

दक्षिण काश्मीरमधील वाम्पोह येथे हे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी राबविलेल्या शोध मोहिमेदरम्यान यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीनगर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर आज (रविवार) सकाळी हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसह पोलिस महानिरीक्षकांना (डीएसपी) अटक केली आहे. यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दक्षिण काश्मीरमधील वाम्पोह येथे हे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी राबविलेल्या शोध मोहिमेदरम्यान यांना अटक करण्यात आली आहे. एका कारमधून हे दोन दहशतवादी डीएसपींसह प्रवास करत होते. यांच्याजवळून तीन एके47 रायफल आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. 

या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, नवीद बाबा आणि आसिफ राथर अशी यांची नावे आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांमध्ये नवीद बाबाचा समावेश आहे. स्थानिक नागरिकांवर हल्ला करण्यात यांचा सहभाग होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu and kashmir dsp arrested with two terrorists