Jammu Kashmir Schools: उन्हामुळे काश्मीरमधील शाळांच्या वेळात बदल
School Timing Change: जम्मू-काश्मीरमधील वाढत्या उष्णतेमुळे शाळा वेळा बदलण्यात आल्या असून, आता सकाळी शाळा आणि नंतर ऑनलाइन वर्ग चालणार आहेत. सरकारने उन्हाळी सुट्टी वाढवण्याऐवजी वेळेतच बदल केला आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या उन्हाच्या झळा बसत आहेत. पण यामुळे उन्हाळी सुट्टीत वाढ करण्यापेक्षा शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सुट्टीनंतर येथील शाळा मंगळवारपासून (ता.८) नव्या वेळेत सुरू होणार आहेत.